ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल इतर गोष्टींसह व्यक्तिगत काळजी घेणे महत्वाचं आहे.
यामध्येच हाता- पायांची स्वच्छता ठेवणं तितकचं महत्वाचं आहे.
नखं कापण्यासाठी नेलकटरचा वापर केला जातो.
मात्र नेलकटरसह येणाऱ्या या दोन सुऱ्यांचा नेमका उपयोग काय हे माहितेय काय?
हा चाकू वक्र आकाराचा असल्याने तुम्ही कोल्ड्रिंक बाटलीचे झाकण उघडण्यासाठी वापर करू शकता.
काही लोक नखातील मळ साफ करण्यासाठी या चाकूचा उपयोग करतात, मात्र असे करू नका यामुळे नखांना इजा होण्याची शक्यता असते.
तुम्ही बाहेर सहलीला असताना सफरचंद , लिंबू कापण्यासाठी या चाकूचा उपयोग होतो.