साम टिव्ही ब्युरो
भारतीय सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया डिसूजाच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.
सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या जेनेलियाने नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
जेनेलिया नेहमीच तिच्या क्युटनेसने चाहत्यांना घायाळ करते.
जेनेलिया देशमुख बॉलिवूड आणि टॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
अभिनेत्री जेनेलियाने मराठी चित्रपटसृष्टीकडे तिचा प्रवास सुरू केला आहे.
'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणारी जेनेलिया आता मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे.
'वेड' या मराठी चित्रपटातून जेनेलिया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
३० डिसेंबर रोजी जेनेलिया अभिनीत 'वेड' हा चित्रपट रिलीज होणार आहे.