Vishal Gangurde
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या गौतमीच्या नृत्य कार्यक्रमात तरुणांकडून हुल्लडबाजी होऊ लागली आहे.
नगरच्या गौतमीच्या कार्यक्रमात हुल्लडबाजांच्या दगडफेकीत एक महिला किरकोळ जखमी झाली होती.
नगरच्या कार्यक्रमानंतर आयोजकांनी व्यवस्थित बंदोबस्त ठेवला नाही तर कार्यक्रम घेणार नाही, असा इशारा गौतमीने दिला होता.
सोलापूरच्या कार्यक्रमातही तिच्या तरुण चाहत्यांनी हुल्लडबाजी केली.
सोलापूरच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमातही पोलिसांनी लाठीमार केला.
ज्या चाहत्यांना गोंधळ घालायचा आहे, त्यांनी कार्यक्रमाला येऊ नका, असे गौतमी पाटील म्हणाली आहे.
ज्यांना कार्यक्रम एन्जॉय करायचा असेल, त्यांनी आवर्जून या, असेही गौतमी म्हणाली.
इन्टाग्रामवर एक महिन्यापूर्वी माझे 1 मिलीयन फॉलोव्हर्स झाले असल्याची माहिती गौतमीने दिली आहे.