साम टिव्ही ब्युरो
लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलला अल्पावधित अमाप प्रसिद्धी मिळाली.
गेल्या काही महिन्यांपासून गौतमी आणि गर्दी समीकरण तयार झालं आहे.
गौतमीनं गेल्या महिन्याभरात लावणीचे कार्यक्रम चांगलेच गाजवले.
गौतमीच्या कार्यक्रमात तरुण मंडळी हजारोच्या संख्येने हजेरी लावतात.
पावसाळ्यात गावा-खेड्यात स्टेज कार्यक्रम फारसे दिसून येत नाही. त्यामुळे गौतमीचे सभागृहातील नृत्य कार्यक्रम वाढू शकतात.
पावसाळ्यामुळे गौतमीच्या स्टेज कार्यक्रमात घट होण्याची शक्यता आहे.
गौतमीचे सध्या रील्स व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल होतात.
गौतमीच्या रील्स व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतो.