साम टिव्ही ब्युरो
गौतमी पाटील ही सोशल मीडियावर ओळखीचा प्रसिद्ध चेहरा बनली आहे.
आपला डान्स आणि एक्स्प्रेशन्सने गौतमीने तरुणाईला वेड लावलं आहे.
26 वर्षीय गौतमी ही डान्सर असून लावणी डान्सर म्हणून तिला ओळखलं जातं.
यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवरतिचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात.
इतकंच काय तर अनेक कार्यक्रमांमध्ये गौतमीला डान्स करण्यासाठी बोलवलं जातं.
त्यासाठी तिला मानधन दिलं जातं.
दरम्यान काही दिवसांपूर्वी व्हिडीओमधील डान्स स्टेप्समुळे गौतमी वादाच्या भोवऱ्यात अडकली.
सार्वजनिक कार्यक्रमात डान्स करताना गौतमीने आक्षेपार्ह डान्स स्टेप्स केल्या.
ज्यामुळे गौतमीला माफी मागावी लागली होती