ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या पावसाळा सुरू झाला की धबधबा, ओहळ या ठिकाणी फिरायला जायचे त्याबरोबरीने कौल चिकन पार्टी असे एक समीकरण सर्वत्र रूढ आहे.
श्रावण महिन्याच्या आधी, अनेकजण गटारी अमावस्या मासांहरी खाण्यापिण्यासाठी साजरी करतात.
गटारी अमावस्येला खवय्यांनी कौल चिकन बनवून खाण्यास खास पसंती दिली आहे.
पहिल्यांदा कौल चांगले स्वच्छ धुऊन घेतले जाते.
सर्वप्रथम धारदार चाकुच्या सहाय्याने चिकनच्या बोनलेस तुकड्यांवर थोड्या चिरा मारा आणि चवीनुसार मीठ व हळद लावून 15 मिनिटांकरीता ते बाजूला ठेवा.
यानंतर चिकनला दही, बटर, हळद, लिंबाचा रस, लाल तिखट, गरम मसाला ,गोडा मसाला, मीठ, आले-लसूण पेस्ट हे एकत्रित मिश्रण लावा
मिश्रण लावलेले चिकन कौलावर एक एक करून सोडा. कौलवर चिकन भाजताना सर्व बाजूंनी ते भाजले जाईल हे पाहताना ते करपणार नाही याची काळजी घ्यावी.
सर्वबाजूंनी चिकन खरपूस भाजल्यानंतर सोनेरी ताबूंस रंग आल्यानंतर चवीनुसार आंबट, तिखट चव लावून खाण्यासाठी तयार करा