Jagdish Patil
अनंत चतुर्दशीनिमित्त आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईतील भारतमाता जंक्शन, परळ येथे जमलेले गणेशभक्त.
गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायला, गुलालाची उधळण करत आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात निरोप दिला.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... अशा गजरात आज बाप्पाचं विसर्जन केलं जात आहे.
गणेश गल्लीतील आकर्षक अशी मुर्ती विसर्जनाला घेऊन जात असतानाचा क्षण.
आयुष्याच्या कोणत्याही प्रसंगात हे अन्नदाता तुझी साथ मला लाभुदे... अशी मागणी मागत बाप्पाला निरोप देताना.
आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी, मुंबईतील लालबाग येथील तेजुकाया गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी भाविक मोठ्या संख्येने सामील झालेत.
मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशा पथकांनी दणदणाट केला.
बाल गणेशभक्ताने आपल्या लाडक्या बाप्पाला प्रेमाने निरोप देत असतानाचा क्षण...
पराभव झाला तरी हरकत नाही पण शेवटपर्यंत झुंझायची शक्ती दे, असं म्हणत भर पावसात गणेश मूर्तीचे विर्जन करताना गणेशभक्त.