Ganpati Bappa: श्री गणेशाचे वाहन मूषक का असतं?

Manasvi Choudhary

गणपती बाप्पाचे वाहन

प्रत्येक देवतेचा वाहन एक प्राणी आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पाचे वाहन हे मूषक आहे.

Ganpati Bappa | Social Media

मूषक

गणपती बाप्पाचे वाहन हे मूषक आहे यामागे देखील कथा आहे.

Ganpati Bappa | Social Media

गणपती बाप्पाची पूजा

गणपती बाप्पाची पूजा करताना त्याच्या पायाजवळ मूषक असतो.

Ganpati Bappa | Social Media

पौराणिक कथा

 कथेनुसार, एकेदिवशी देवराज इंद्राचीने सभा भरवली होती त्यावेळी क्रौंच नावाच्या गंधर्वाला देखील बोलवण्यात आले होते

Ganpati Bappa | Social Media

देवराज इंद्राची गंधर्वला सभेला बोलवले

गंधर्व सभेला उपस्थित राहण्यासाठी धावपळीत सभेला जात होता यावेळी बामदेव महर्षीना त्याचा पाय लागला

Ganpati Bappa | Social Media

गंधर्वला शाप दिला

महर्षी संतापले आणि त्यांनी त्या गंधर्वाला शाप दिला कि, तू तुरु तुरु धावणारा उंदीर होशील.

Ganpati Bappa | Social Media

गंधर्वाचे रूपांतर उंदरात झाले

महर्षींच्या शापाने क्रौंच गंधर्वाचे रूपांतर उंदरात झाले. गंधर्वाचा उंदीर झालेला पाराशर ऋषींच्या आश्रमाजवळ पडला आणि त्याने आश्रमातील ऋषींची वस्त्रे, ग्रथ- पोथ्या अस सर्वकाही कुरतडून टाकले.

Ganpati Bappa | Social Media

पाराशर ऋषींनी गणेशाजवळ प्रार्थना केली

वैतागलेल्या ऋषींनी उंदराला पकडण्याचा प्रयत्न केला पण ते पकडू शकला नाही. हे पाहून पाराशर ऋषींनी गणेशाला प्रार्थना केली. 

Ganpati Bappa | Social Media

वर मागितला

गणेशाने आपल्या चतुर बद्धीने पाश टाकून उंदराला पकडले तेव्हा सुटकेसाठी तो उंदीर गयावया करु लागला. तेव्हा गणपती बाप्पाने प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितले.

Ganpati Bappa | Social Media

वाहन

तेव्हा उंदीर गणपती बाप्पाला म्हणाला मला तुझ्याकडून काहीही नकोय, याउलट तुच माझ्याकडे वर माग. असे सांगितले

Ganpati Bappa | Social Media

गणपती बाप्पा

गणपती बाप्पा टुणूककन उंदरावर स्वार झाले त्यादिवसापासून तो गणपती बाप्पांचे वाहन झाला अशी कथा आहे.

Ganpati Bappa | Social Media

NEXT: Ganesh Chaturthi 2023: गणपतीला २१ मोदकांचा नेवैद्य का दाखवतात?

Ganesh Chaturthi 2023 | Social Media