Priya More
सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचा आनंद पाहायला मिळत आहे. बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी भक्त मोठ्यासंख्येने जात आहेत.
मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून जीएसबी सेवा मंडळाच्या गणपती बाप्पाची ओळख आहे.
जीएसबी गणेशोत्सव मंडळाचा गणपती बाप्पा हा गणेशभक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.
जीएसबीच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात.
जीएसबीच्या गणपती बाप्पाची सर्वच आभूषणं सोन्याची आहेत. या बाप्पाचा भाविक सोनं आणि चांदी दान करत असतात.
जीएसबी गणेश मंडळाच वैशिष्ट्य म्हणजे प्रथा, परंपरा आणि विधीवत पद्धतीने या ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो.
जीएसबी गणेश मंडळाची मूर्ती ही पूर्णपणे शाडू मातीने साकारण्यात येते.
यावर्षी जीएसबीच्या बाप्पाची मूर्ती ६६ किलोपेक्षा जास्त सोनं आणि ३३६ किलो चांदीच्या दागिन्यांनी सजवण्यात आली होती.
या गणेशोत्सव मंडळाने बाप्पाचे दागिने आणि गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी मंडळाने ३६०.४० कोटी रुपयांचा विमा करून घेतला आहे.
या गणेशोत्सव मंडळामध्ये २४ तास विधी केले जातात.