Priya More
यावर्षी अंधेरीचा राजा गणेशोत्सव मंडळाने शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आकर्षक देखावा तयार केला आहे.
मुंबईतल्या अंधेरीच्या आझादनगर परिसरात असलेला अंधेरीचा राजा हा गणपती बाप्पा खूपच प्रसिद्ध आहे.
अंधेरीच्या राजाचे इतर गणपती बाप्पाप्रमाणे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन होत नाही.
अंधेरीच्या राजाचे अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या संकष्टीला विसर्जन करण्यात येते.
अंधेरीतील वर्सोवा चौपाटीवर अंधेरीचा राजा या गणपती बाप्पाचे विसर्जन होतं.
अंधेरीच्या राजाची आकर्षक मूर्ती पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करत असतात.
बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतील कलाकार देखील अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी करतात.
अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांना हाफ पॅन्ट, शॉर्ट स्कर्ट मनाई करण्यात आली आहे.