Ganesh Chaturthi 2026: गणरायाला मोदक का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

Shruti Vilas Kadam

बाप्पाला मोदक का आवडतो?

पौराणिक मान्यतेनुसार, माता पार्वतीने गणपती बाप्पासाठी प्रेमाने मोदक तयार केला. हा गोड पदार्थ बाप्पाला खूप आवडला आणि तेव्हापासून मोदक त्यांचा आवडता नैवेद्य मानला जातो.

Ganesh Chaturthi | yandex

‘मोदकप्रिय’ नाव कसे पडले?

गणपतीला मोदक अतिशय प्रिय असल्याने त्यांना ‘मोदकप्रिय’ असे प्रेमाने संबोधले जाते. गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यात मोदकाला विशेष स्थान असते.

Fried Modak Recipe | yandex

मोदकाच्या आतला गोडवा काय सांगतो?

मोदकाच्या बाहेरील आवरणापेक्षा त्याच्या आत असलेले गोड सारण अधिक महत्त्वाचे असते. त्यातून माणसाचे बाह्य रूप नव्हे, तर चांगले गुण आणि अंतर्मन महत्त्वाचे असल्याचा संदेश दिला जातो.

Ganesh Chaturthi | pinterest

गूळ-नारळाच्या सारणाचा आध्यात्मिक अर्थ

मोदकातील गूळ आणि नारळाचे गोड सारण हे ज्ञान, आनंद आणि समाधानाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे मोदकाला केवळ गोड पदार्थ न मानता आध्यात्मिक अर्थानेही महत्त्व दिले जाते.

Ganesh Chaturthi | pinterest

मोदक म्हणजे ज्ञानाचे प्रतीक

गणपती हे बुद्धी आणि ज्ञानाचे देव मानले जातात. त्यामुळे त्यांच्या आवडीचा मोदक हा ज्ञान मिळाल्यानंतर अनुभवता येणाऱ्या आनंदाचे आणि गोड फळाचे प्रतीक मानला जातो.

Ganesh Chaturthi | google

२१ मोदकांचा नैवेद्य का?

गणेशोत्सवात अनेक ठिकाणी बाप्पाला २१ मोदकांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. यामागे गणपती आणि माता अनुसया यांच्याशी संबंधित विविध पौराणिक कथा प्रचलित आहेत.

Ganesh Chaturthi | Saam Tv

भक्ती आणि प्रेमाचे प्रतीक

बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवताना भक्त त्यांच्या मनातील श्रद्धा, प्रेम आणि भक्ती व्यक्त करतात. त्यामुळे गणेशोत्सवात मोदक हा बाप्पाचा आवडता प्रसाद आणि भक्तांच्या आनंदाचा खास भाग मानला जातो.

Ganesh Chaturthi | Yandex

Avocado Benefits: रोज एक अव्होकॅडो खाल्ल्याने काय होतं? जाणून घ्या शरीराला मिळणारे 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Avocado Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा