Pathnatya History: पथनाट्यांची सुरुवात कशी झाली? इतिहास जाणून घ्या

Dhanshri Shintre

पथनाट्ये

तुम्ही अनेकदा पथनाट्ये पाहिली असतील, पण या कलाप्रकाराची सुरुवात नेमकी कधी आणि कशी झाली हे तुम्हाला माहिती आहे का?

समृद्ध परंपरा

भारतातील नाट्यकलेला समृद्ध परंपरा लाभली आहे. नाटकांच्या माध्यमातून लोक सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक वारशाचे दर्शन आणि चिंतन करतात.

नाट्यपरंपरा

भारतीय नाटकाची मूळ प्राचीन नाट्यपरंपरेत आहे, आणि कालांतराने विविध प्रदेश, भाषा व सांस्कृतिक पद्धतींचा समावेश करून ती विकसित झाली आहे.

क्रियाकलाप साजरे करत

आदिम युगात शिकारी लोक संध्याकाळी वर्तुळात एकत्र जमून जेवण करायचे. नाचत आणि गाणी म्हणत सांस्कृतिक आणि सामाजिक क्रियाकलाप साजरे करत असत.

घडामोडी

या काळात लोक आपल्या दिवसातील घडामोडी नाटकाच्या रूपात सादर करून मनोरंजन आणि समाजसुधारणेचे माध्यम वापरायचे.

वेठी नाटकम

आजही आंध्र प्रदेशात 'वेठी नाटकम' नावाची लोकनाट्य परंपरा जपली जाते, आणि आधुनिक नाटकेही त्याच नावाने ओळखली जातात.

लोकनाट्यांचे स्वरूप

मध्ययुगीन भारतात विविध प्रांत, प्रदेश आणि बोलीभाषांमध्ये लोकनाट्यांच्या स्वरूपात पथनाट्यासारखी नाट्यशैली उदयास आली आणि हळूहळू विकसित झाली.

धार्मिक नाटकं

पाश्चिमात्य देशांत इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनमध्ये बायबलवर आधारित चर्च व धार्मिक नाटकं लोकप्रिय झाली, जी धर्मप्रसारासाठी सादर केली जात होती.

नाटके रात्री सादर करायचे

पाश्चिमात्य देशांतील नाटके शेत, चौक, बाजारात दिवसा सादर केली जात असत, तर भारतात ही नाटके सुरुवातीपासूनच बहुतेक रात्री सादर केली जात होती.

NEXT:  'या' गावाच्या नावावरून कुचीपुडी नृत्याचे नाव पडले, जाणून घ्या त्याचा इतिहास

येथे क्लिक करा