Rohini Gudaghe
देशातील नागरिकांना मोफत वीज मिळावी, यासाठी सरकारने पीएम सूर्य घर योजना सुरू केली आहे.
या योजनेत १ कोटी लोकांना ३०० युनिट्सपर्यंत मोफत वीज मिळणार आहे.
सौरउर्जा आणि प्रगतीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरु केली आहे.
या प्रकल्पात सरकारची ७५,००० कोटी रुपयांहून अधिक रुपयांची गुंतवणूक होणार आहे.
दरमहा १ कोटी घरांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे.
या योजनेतंर्गत, सरकार ३ किलोवॅट रुफटॉप पॅनेल बसविण्यासाठी ३६ हजार रुपयांपर्यंत अनुदान देते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
१ फेब्रुवारी रोजी पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेची घोषणा केली.
स्वत:चे घर असलेले गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेले कुटुंब या योजनेसाठी पात्र आहेत.