ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टाटा उद्योगसमुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झालं.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरच्या चारोटी परिसरात त्यांच्या मर्सिडिज कारला अपघात झाला.
सायरस मिस्त्री हे सध्या शापूरजी पालोनजी अँड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते.
सायरस मिस्त्री यांचे आजोबा शापूरजी मिस्त्री यांनी १९३० मध्ये त्यांचा कौटुंबिक व्यवसाय सुरू केला.
सायरस मिस्त्री यांचा जन्म मुंबईतील एका पारसी कुटुंबात झाला होता. त्यांचे वडिल पल्लोनजी मिस्त्री एक नामवंत उद्योगपती होते.
सायरस यांनी आपले शिक्षण लंडन बिझनेस स्कूलमधून पूर्ण केले.
२००६ मध्ये सायरस मिस्त्री टाटा समूहाचे अध्यक्ष बनले. टाटा समूहाचा कारोभार त्यांनी व्यवस्थितरित्या सांभाळला.