Surabhi Jagdish
जगातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणजे भारताचा ताजमहाल. ताजमहाल त्यांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
ताजमहालशी संबंधित अनेक रहस्यमयी गोष्टी लोकप्रिय आहेत. परंतु आज आम्ही तुम्हाला त्याच्याशी संबंधित एक तथ्य सांगणार आहोत.
ताजमहाल पहाटे 6 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत पर्यटकांसाठी खुला असतो. मात्र त्यानंतर प्रवेशावर बंदी असते.
तुम्हाला कल्पना आहे का की, ताजमहालमध्ये रात्री अंधार असतो. शिवाय तिथले दिवे सुरु नसतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ताजमहालमध्ये दिवे न लावण्यामागील मुख्य कारण म्हणजे किडे.
प्रकाशाकडे आकर्षित होणारे कीटक ताजमहालात येतात आणि त्यांचे मलमूत्राची घाण त्याचठिकाणी सोडतात. कीटकांच्या घाणीमुळे ताजमहालचाच्या फरशांवर डाग पडू शकतात.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणानुसार, या कीटकांमुळे ताजमहालचं नुकसान होतं आणि संगमरवरावर त्या खुणा राहतात. याच कारणामुळे 1997 पासून ताजमहालवरील लायटींग बंद करण्यात आलीये.