Shruti Vilas Kadam
मोठ्या आकाराची गुलाब, कमळ किंवा इतर फुलांची प्रिंट असलेली साडी आकर्षक आणि स्टायलिश लूक देते. साध्या ब्लाउजसोबत अशी साडी खुलून दिसते.
छोट्या-छोट्या फुलांची नाजूक प्रिंट असलेली साडी एलिगंट लूकसाठी उत्तम पर्याय आहे. ऑफिस, छोट्या कार्यक्रमांसाठी किंवा डे-टाइम फंक्शनसाठी ती घालता येते.
पिंक, लॅव्हेंडर, पीच, मिंट किंवा बेबी ब्ल्यूसारख्या पेस्टल रंगांवरील फ्लोरल प्रिंट साडीला सॉफ्ट आणि मॉडर्न लूक देते.
ब्लॅक बेसवर रंगीबेरंगी फुलांची प्रिंट असलेली साडी ग्लॅमरस लूकसाठी निवडता येते. कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि मिनिमल ज्वेलरीसोबत ती सुंदर दिसते.
पांढऱ्या किंवा ऑफ-व्हाइट रंगावर फुलांची प्रिंट असलेली साडी फ्रेश आणि क्लासी लूक देते. उन्हाळ्यात किंवा दिवसाच्या कार्यक्रमांसाठी हा पर्याय खास दिसतो.
हलके आणि फ्लोई फॅब्रिक आवडत असेल तर शिफॉन किंवा जॉर्जेटमधील फ्लोरल साडी निवडा. ती नेसण्यास सोपी असून आकर्षक ड्रेपिंग लूक देते.
पारंपरिक आणि आधुनिक स्टाइलचा मेळ साधायचा असेल तर फ्लोरल प्रिंट सिल्क साडी निवडू शकता. पारंपरिक दागिने आणि सुंदर हेअरस्टाइलसोबत लूक अधिक उठून दिसतो.