Nath Designs: नथीचा नखरा! लग्न समारंभासाठी शानदार लूक हवा? पाहा नथीचे डिझाइन

Bharat Jadhav

नथीचे अनेक प्रकार

नथीचे अनेक प्रकार आहेत यात पेशवेकालीन नथ, मराठा नथ, ब्राह्मणी नथ, कारवारी नथ आणि बानू नथ हे प्रमुख प्रकार आहेत.

शिकारपुरी नथ

शिकारपुरी नथ पंजाबी नववधूंमध्ये खूप लोकप्रिय आहे. ही नथी वेगवेगळ्या आकाराची असते. ही नथनीला एक आकर्षक सजवलेली साखळी लावली असते. ही साखळी डोक्याच्या केसांमध्ये अडकवली जाते. या नथनीसह चमकदार सोन्याचा हार आणि जुळणाऱ्या कानातले झुमके परिधान केले तर तुमचा लूक मोहक होईल.

मोती आणि सोन्याची नथ

तुम्ही जर मोती आणि सोन्याची नथी नाकात घातली तर तुमच्या लूकचे कोणीही कौतुक करेल. गोल मोत्याची नथ सोन्याच्या नक्षीमुळे वधूचा लूक अधिक आकर्षक बनवेल.

आकर्षक मराठी नथ

जर तुम्ही मराठी वधूचा पारंपारिक पद्धतीने लूक करणार असाल तर सुंदर सोन्यापासून बनवलेल्या रंगीबेरंगी खडे असलेली नथ निवडा. सोनेरी रंगाचा रंग बेस ठेवा आणि त्यात आकर्षक लाल आणि हिरवे आकर्षक दगड त्यात ठेवा.

मोठी सोन्याची नथ

वधूंचा लूक अधिक आकर्षक करायचा असेल तर मोठ्या आकाराची गोल नथ तुमचा लूक परिपूर्ण करेल. पारंपारिक सोन्याचा हार, लांब राणीचा हार, जुळणारे कानातले परिधान केले तर सर्वांच्या नजरा तुमच्यावरच खिळतील.

घुंगरूवाली नथ

जर तुम्ही काहीतरी वेगळे आणि सुंदर नथ शोधत असाल, तर वधूच्या लूकसाठी ही नथ छान आहे. सोन्याच्या मोती आणि सोनेरी घुंगरूची नथ अनेकांना आवडेल.