प्रविण वाकचौरे
क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी अटी आणि नियम काळजीपूर्वक वाचा. अनावश्यक खर्च टाळा.
तुमचा खर्च क्रेडिट मर्यादेच्या 30 ते 40 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा.
क्रेडिट कार्डवरुन खर्च केलेले पैसे खर्च करता येणार असतील तरच खर्च करा.
क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर बिले भरा आणि क्रेडिट कार्ड बिलिंग सायकल समजून घ्या.
मोठ्या व्यवहारांवर किंवा संपूर्ण क्रेडिट कार्ड मर्यादा वापरल्यानंतर परतफेडीसाठी तुम्ही EMI पर्याय निवडू शकता.
क्रेडिट कार्डमधून रोख रक्कम काढणे टाळा कारण त्यावरील व्याज (४० टक्के) खूप जास्त आहे.
तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असल्यास, ऑटो-डेबिट पर्याय निवडा जेणेकरून पेमेंट चुकणार नाही.
परदेश दौर्यादरम्यान क्रेडिट कार्ड वापरण्यापूर्वी, शुल्काबद्दल बँकेकडे तपासा.