Chandrakant Jagtap
अनेकांची तरुण वयात श्रीमंत होण्याची स्वप्ने असतात. परंतु त्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
तुम्ही कमाई सुरू केली असेल तर आर्थिक व्यवस्थापन करणे गरजेचे असते, त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
खर्चावर ताबा हवा. यासाठी रोख किंवा डेबिट कार्डने पैसे द्या. क्रेडिट कार्ड वापरणे टाळा.
क्रेडिट कार्डचं बिल वेळेवर न भरल्यास त्यावर दंड लागू शकतो. चांगल्या क्रेडिट स्कोअरसाठी फक्त आणीबाणीसाठी त्याचा वापर करा.
तुमचा खर्च तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त होऊ देऊ नका आणि तुमचे पैसे कुठे जातात ते पहा. यासाठी बजेट तयार करा करा.
तुम्ही कितीही तरुण असलात तरी तुमच्या निवृत्तीची योजना आत्ताच तयार करा. यामुळे उतार वयात तुमची आर्थिक बाजू बजबूत बनेल.
तुमच्या एकंदरीत इन्कमपैकी काही भाग बचत करा. वेगवेगळ्या बचत योजनांमध्ये हे पैंसे गुंतवा. यामुळे तुमचा पैसा वाढत राहील.
तज्ञांच्या सल्ल्याने एसआयपी किंवा म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करा. यामुळे तुम्हाला तुमचे आर्थिक ध्येय गाठण्यासाठी मदत होईल.