कोमल दामुद्रे
महिनाभर मेथीचे पाणी प्यायलात तर तुमचं आरोग्य अनेक प्रकारे सुधारू शकते.
अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या लोकांसाठी मेथीचे पाणी खूप फायदेशीर आहे.
मेथीच्या दाण्यांचे पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल ठीक राहते.
मेथीच्या दाण्यांमध्ये म्युसिलेज नावाचे तत्व आढळते, ज्यामुळे सर्दी आणि खोकल्यामध्ये आराम मिळतो.
मेथीचे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्यास साखरेवर नियंत्रण ठेवण्यास खूप मदत होते.
सकाळी मेथीच्या दाण्यांचे पाणी प्यायल्यानं दिवसभराची भूक कमी होते, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.