वडील-मुलीने डिकोड केला Alien Signal? मंगळावरून आलेला मेसेज, काय आहे मेसेजमागचं रहस्य?

Surabhi Jagdish

अमेरिकेत राहणाऱ्या एका मुलीने आणि तिच्या वडिलांनी मंगळावरून पाठवलेला एलियन सिग्नल डीकोड केलाय. केन शॅफिन आणि केली शॅफिन अशी या दोघांची नावं आहेत.

युरोपियन स्पेस एजन्सीच्या ऑर्बिटरला मंगळावरून हा सिग्नल मिळाला आणि तो पृथ्वीवर पाठवण्यात आला. हा सिग्नल डीकोड करण्यासाठी ESA ने सिटीझन सायंटिस्ट स्पर्धा आयोजित केली होती.

जगभरातील पाच हजारांहून अधिक शास्त्रज्ञ हा सिग्नल डीकोड करण्यावर काम करत होते.

अमेरिकेच्या केन आणि केली शॅफिनने आता हा सिग्नल डीकोड केला आहे. या सिग्नलमध्ये काळ्या बॅकग्राऊंडसह पांढरे डॉट्स आणि रेषांचे पाच गट होते.

हे पेशींच्या निर्मितीकडे म्हणजेच जीवनाच्या निर्मितीकडे निर्देश करत होते. केन आणि केली यांनी सांगितलं की, संदेशामध्ये पाच अमीनो ऍसिड आहेत, जे विश्वामध्ये जीवन निर्माण करतात.

या सर्व जैविक मॉलिक्यूलसच्या आकृती आहेत. म्हणजेच लाईफ देणाऱ्या अमिनो आम्लांचे डायग्राम आहेत.

या ब्लॉक्समध्ये तुम्हाला १,६, ७, ८ पिक्सेलचे एटॉमिक नंबर सापडतील. म्हणजेच हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. या डायग्रामधील लाईन्स अणू आकृतींप्रमाणेच एकल आणि दुहेरी बाँडपासून बनवलेल्या आहेत.

डॉट्स त्यांना जोडण्याचं काम करतात. केन आणि कॅलीने सिग्नल डीकोड केला आहे. पण सिटीझन शास्त्रज्ञ अजूनही ते समजून घेण्याचा प्रयत्न करतायत.