फटाके फुटताना मोठा आवाज कुठून येतो?

Manasvi Choudhary

दिवाळी

दिवाळीत फटाके फोडण्याची मज्जा काहीशी वेगळीच असते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला फटाके फोडण्यात आनंद वाटतो.

Diwali | pinterest

फटाक्यांचा आवाज

फटाक्यातून निघणारे रंगीबेरंगी रंग आणि मोठा आवाज हा आकर्षित करतो. परंतु तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, फटाक्यातून नेमका आवाज कसा निघतो.

Why Firecrackers Make a Loud Noise

दारूगोळा आणि रसायनांचे मिश्रण

फटाक्यांच्या आत दारू असते. जी पोटॅशियम नायट्रेट, गंधक आणि कार्बनचे मिश्रणने भरलेली असते. ही सर्व रसायने अतिशय ज्वलनशील आणि स्फोटक असतात.

Why Firecrackers Make a Loud Noise

प्रचंड उष्णता आणि ज्वलन प्रक्रिया

जेव्हा आपण फटाक्याला आग लावतो, तेव्हा आगीची ठिणगी आत असलेल्या रसायनांपर्यंत पोहोचते. तेव्हा फटाक्यातून आवाज बाहेर निघतो.

Why Firecrackers Make a Loud Noise

वायूचे अतिवेगाने प्रसरण

रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर सॉलिड स्वरूपात असलेली रसायने एका सेकंदापेक्षाही कमी वेळात वायूमध्ये रूपांतरित होतात. निर्माण झालेला हा वायू जागेच्या अभावामुळे अत्यंत वेगाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, ज्याला 'रॅपिड गॅस एक्सपान्शन' म्हणतात.

Rapid Gas Expansion

हवेवरील दाब आणि मोठा आवाज

जेव्हा हा गरम वायू फटाक्याच्या कागदी किंवा कार्डबोर्डच्या आवरणाला फाडून बाहेर फेकला जातो, तेव्हा तो आजूबाजूच्या हवेवर प्रचंड दाब टाकतो. तेव्हा फटाक्यातून आवाज येतो.

Sonic Pressure Wave

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: Best Wallet Colors for Financial Growth: पैशात वाढ होण्यासाठी कोणत्या रंगाचे पाकीट व पर्स वापरावी?

Best Wallet Colors for Financial Growth
येथे क्लिक करा..