Shruti Vilas Kadam
पॅकेज्ड फूड, फास्ट फूड, तळलेले पदार्थ यामुळे वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे असे पदार्थ टाळा.
डाळ-भाज्या, चपाती, भात, पनीर यांसारखे संतुलित आणि घरचे पदार्थ खाणं अधिक फायदेशीर ठरतं.
अंडं, डाळी, पनीर, कडधान्य यांसारख्या प्रोटीनयुक्त पदार्थांमुळे भूक कमी लागते आणि स्नायू टिकून राहतात.
दररोज पुरेसं पाणी प्यायल्याने पचन सुधारतं, शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि ब्लोटिंग कमी होतं.
साखरेचे पदार्थ, कोल्डड्रिंक आणि जास्त मिठाचा वापर कमी करा, कारण यामुळे शरीरात चरबी साठते.
दररोज रात्री किमान ७-८ तासांची गाढ झोप घेणं वजन कमी करण्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे.
तुम्ही काय खात आहात आणि किती व्यायाम करता याची नोंद ठेवल्यास वजन नियंत्रणात ठेवणं सोपं होतं.