Shruti Vilas Kadam
'फँड्री'मधील साध्या-भोळ्या 'शालू'च्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली राजेश्वरी खरात आता तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.
राजेश्वरीने मॉडर्न आणि वेस्टर्न पोशाखात केलेले फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. तिच्या फॅशन सेन्सचे अनेकजण कौतुक करत आहेत.
हलका मेकअप, मोकळे केस आणि आत्मविश्वासपूर्ण पोझ यामुळे तिच्या नव्या लूकला अधिक आकर्षक स्वरूप मिळाले आहे.
तिने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असून तिच्या नव्या स्टाईलचे भरभरून कौतुक केले जात आहे.
'शालू'च्या साध्या भूमिकेनंतर तिच्या व्यक्तिमत्त्वात आणि स्टाईलमध्ये झालेला बदल अनेकांना आश्चर्यचकित करणारा ठरला आहे.
तिच्या प्रत्येक फोटोमध्ये आत्मविश्वासपूर्ण बॉडी लँग्वेज आणि वेगळा स्टाईल स्टेटमेंट पाहायला मिळतो, त्यामुळे तिचा प्रत्येक लूक चर्चेचा विषय ठरतो.
राजेश्वरी नवनवीन फोटो आणि रील्स सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे तिच्या प्रत्येक पोस्टची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.