Satish Daud
दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘फँड्री’ या चित्रपटातून मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात चर्चेत आली.
‘फँड्री’ चित्रपटात राजेश्वरीचा एकही डॉयलॉग नव्हता, तरी सुद्धा ती फेमस झाली.
राजेश्वरीने साकारलेली शालूची भूमिका चाहत्याच्या मनात घर करून गेली.
या चित्रपटातील ‘काळ्या चिमणीची राख गावली काय लेका…’ हा जब्याचा डॉयलॉग खूपच फेमस झाला.
चित्रपटातील अभिनयासोबत राजेश्वरी सोशल मीडियावरही सक्रिय असते.
आता तिने तिचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळे चाहते तर घायाळ झालेचं आहेत.
या फोटोमध्ये राजेश्वरी खरातने कलरफूल ड्रेस घातला असून त्यावर निळ्या रंगाची टोपी घातली आहे.
राजेश्वरीच्या या फोटोवर तिचे चाहते तुफान प्रतिक्रिया देत आहेत. नेटकरी तिला जय हरी माऊली म्हणत आहेत.