Chetan Bodke
प्रसिद्ध गायक अरमान मलिकने आज सोशल मीडियावर एंगेजमेंटचे फोटो शेअर केले.
अरमानने गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत ८ ऑगस्ट रोजी साखरपुडा केला होता.
“आणि आता आम्ही कायमचे एकत्र राहणार...” अशा आशयाचे कॅप्शन देत दोघांनीही साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
अरमान आणि आशना २०१९ पासून एकमेकांना डेट करत असून लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत.
आशना श्रॉफबद्दल बोलायचे तर, ती एक प्रसिद्ध युट्युबर, ब्लॉगर देखील आहे.
आशनाने लंडनमधून फॅशनचे शिक्षण घेतले असून ती सोशल मीडियावर फॅशन आणि ब्यूटीसंदर्भातील व्हिडीओ बनवून शेअर करते.
आशना अरमानपेक्षा दोन वर्षाने मोठी असून तिचा जन्म 4 ऑगस्ट १९९३ तर अरमानचा जन्म २२ जुलै १९९५ला झाला आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये अरमान खाली बसून आशनाला अंगठी घालताना दिसतोय.
ईशा गुप्ता, झरीन खान, नीती मोहन, तारा सुतारिया, आहाना कुमरा ते टायगर श्रॉफ पर्यंत अनेक सेलिब्रिटींनी त्यांना सोशल मीडियावर कमेंट्सच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव केला.