ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुंबईला पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. मुंबईत अनेक ठिकाणी पर्यटक आवर्जून भेट देतात.
मुंबईतील अनेक गणपती मंदिरांना भाविक भेट देतात. मुंबईतील या मंदिरांना ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
सिद्धिविनायक मंदिर मुंबईतील प्रभादेवी येथे आहे. रोज शेकडोंच्या संख्येने भाविक या मंदिराला भेट देतात.
बोरीवली पूर्व येथे महावीर नगरमध्ये हरिदास नार गणपती मंदिर वसलेले आहे. येथील वातावरण खूप प्रसन्न आहे.
वाकोला येथील आनंद नगर गणेश मंदिर खूप प्रसिद्ध आहे.
बोरीवलीतील लोकमान्य टिळक रोडवर स्वयंभू गणपती मंदिर आहे. येथे मंगळवारी आरतीसाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते.
गिरगावमधील आंबेवाडी येथे फडके श्री गणपती मंदिर आहे. येथे रोज खूप भाविक भेट देतात.