तुळशीबाग ते कसबा..! पुण्यातल्या या मानाच्या गणपतीविषयी माहितेय का ?

कोमल दामुद्रे

पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, कारण याच शहरातून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली होती.

Pune Ganpati Festival | Canva

कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळा एवढी होती.

Kasba | Canva

श्री तांबडी जागेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता. म्हणूनच तांबडी जोगेश्वरी गणपतीला मानाचं दुसरं स्थान प्राप्त झाल आहे. बुधवार पेठेतल्या या गणेशोत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली.

Shree Tambadi Jogeshvari | Canva

गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा पुण्याचा मानाचा तिसरा गणपती. प्रारंभी हा गणपती तालमीमध्ये बसवला जायचा. लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला.

Guruji Talim | Canva

पुण्यातला मानाचा चौथा गणपती तुळशीबागेतला गणपती. तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती हा उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. दक्षित तुळशीबागवाले यांनी १९०० साली या गणेशोत्सवाची उत्सव सुरुवात केली.

Tulsibaug Ganpati | Canva

पुण्यातला शेवटचा आणि पाचवा मानाचा गणपती आहे केसरी गणपती. केसरी संस्थेचा हा गणेशोत्सव १८९४ पासून सुरु झाला.

Kesari Ganpati | Canva
येथे क्लिक करा