Shruti Vilas Kadam
कॉफी त्वचेवरील मृत पेशी हटवते, ऑइल संतुलन राखू शकते आणि त्वचेवर नैसर्गिक ग्लो आणते.
सर्वप्रथम चेहरा सौम्य फेसवॉशने धुवावा, ज्याने वरची धूळ-केशरी आणि ऑयल कमी होतील.
१ चमचा कॉफी पावडर + दही किंवा गुलाबजल मिसळून पेस्ट तयार करावी आणि त्याने हलक्या हाताने २ मिनिटं गोलाकार हालचालीने मसाज करावी.
स्क्रब केल्यानंतर १ चमचा कॉफी, मुल्तानी मिट्टी आणि गुलाबजल यांचं मिश्रण पेस्ट बनवून चेहर्यावर लावावे. २ मिनिटांनी हे फेस पॅक कोमट पाण्याने धुवावे.
स्वच्छ केल्यानंतर चेहरा कोरडा करून ऑइल-फ्री मॉइस्चरायझर किंवा अलोवेरा जेल लावावे, ज्याने त्वचेचा हायड्रेशन आणि ऑयल संतुलन राखता येईल.
आठवड्यातून दोनदा हाच क्लीनअप रूटीन वापरावा. तसेच संवेदनशील त्वचा असल्यास प्रथम पॅच टेस्ट करावा. तसेच क्लीनअप नंतर थेट सूर्यप्रकाशात जाण्याचे टाळावे.
ही पद्धत त्वचेवरील अतिरिक्त ऑयल, धूळ आणि मृत पेशी कमी करून त्वचेवर नैसर्गिक चमक आणू शकते. नियमित वापराने चेहरा ताजाच, स्वच्छ आणि पिंपल-फ्री दिसू शकतो