Shruti Vilas Kadam
बदामामध्ये व्हिटॅमिन ई, अँटिऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक घटक असतात. दूधासोबत वापरल्यास त्वचेला खोलवर पोषण मिळण्यास मदत होते.
दूध आणि बदामाचा लेप त्वचेतील कोरडेपणा कमी करून नैसर्गिक ग्लो वाढवण्यास मदत करू शकतो. नियमित वापरामुळे त्वचा अधिक तजेलदार दिसू शकते.
बदामातील पोषक घटक आणि दुधातील लॅक्टिक अॅसिड त्वचेवरील टॅन, काळे डाग आणि असमान त्वचा रंग कमी करण्यास मदत करू शकतात.
उगाळलेल्या बदामाचे कण त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतात. त्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ आणि मऊ वाटू शकते.
रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी चेहरा स्वच्छ करून हा लेप लावा. 15 ते 20 मिनिटे ठेवून कोमट पाण्याने धुवून टाका.
कोरडी आणि निस्तेज त्वचा असलेल्या व्यक्तींना हा नैसर्गिक फेस पॅक अधिक उपयुक्त ठरू शकतो. तो त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतो.
संवेदनशील त्वचा किंवा दूध अथवा बदामाची अॅलर्जी असलेल्या व्यक्तींनी प्रथम हातावर पॅच टेस्ट करावी. कोणतीही जळजळ किंवा त्रास झाल्यास वापर थांबवावा.