Shruti Vilas Kadam
२ चमचे मुलतानी माती, १ चमचा चंदन पावडर आणि आवश्यक तेवढे गुलाब पाणी मिसळून पेस्ट तयार करा.
तयार पेस्ट चेहऱ्यावर समान पसरवा आणि १०-१५ मिनिटे सुकू द्या.
मुलतानी माती अतिरिक्त तेल शोषून घेते आणि त्वचा स्वच्छ व फ्रेश ठेवते.
चंदन त्वचेला नैसर्गिक उजळपणा देऊन चेहऱ्यावर ग्लो आणते.
हा फेसपॅक त्वचेतील घाण काढून पिंपल्स कमी करण्यास मदत करतो.
गुलाब पाणी त्वचेला थंडावा देऊन रिफ्रेश करते.
पॅक सुकल्यानंतर कोमट पाण्याने हलक्या हाताने धुवा आणि नंतर मॉइश्चरायझर लावा.