Shruti Vilas Kadam
२ चमचे कॉफी पावडर + १ चमचा कच्चा मध. मिसळा, लावा, हलक्या हाताने मसाज करा, ३ मिनिटांनंतर धुवा. मधामुळे त्वचेला ओलावा मिळतो. १५-२० मिनिटे (किंवा सुकेपर्यंत) लावून ठेवा, थंड पाण्याने धुवा.
२ चमचे कॉफी पावडर + १ चमचा साधा दही. मिसळा, हलक्या हाताने मसाज करा, २-३ मिनिटांनंतर धुवा. दह्यामुळे प्रोबायोटिक्स मिळतात. १५-२० मिनिटे (किंवा सुकेपर्यंत) लावून ठेवा, थंड पाण्याने धुवा.
१ चमचा कॉफी पावडर + १ चमचा साखर + १ चमचा ऑलिव्ह/नारळाचे तेल. चांगले मिसळा, गोलाकार मसाज करा, धुवा. शरीरासाठी उत्तम, तुमच्या त्वचेला सूट होणारे तेल वापरा. १५-२० मिनिटे (किंवा सुकेपर्यंत) लावून ठेवा, थंड पाण्याने धुवा.
१ चमचा कॉफी + १ चमचा तांदळाचे पीठ + २ चमचे कोमट पाणी (किंवा मध). पेस्ट होईपर्यंत मिसळा, १५-२० मिनिटे (किंवा सुकेपर्यंत) लावून ठेवा, थंड पाण्याने धुवा.
कॉफीतील कॅफिन रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास मदत होते.
घरगुती कॉफी स्क्रब नियमित वापरल्यास सूर्यप्रकाशामुळे झालेला टॅन हळूहळू कमी होतो.
कॉफी स्क्रब पोअर्स खोलवर स्वच्छ करतो. त्यामुळे ब्लॅकहेड्स व व्हाईटहेड्सची समस्या कमी होते.
कॉफीतील अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरील जंतुसंसर्ग कमी करण्यास मदत करतात, त्यामुळे मुरुमांची समस्या आटोक्यात येते.