Shruti Vilas Kadam
पापण्यांच्या केसांचंही नैसर्गिक चक्र असतं. त्यामुळे काही पापण्या गळून त्यांच्या जागी नवीन पापण्या येतात. मात्र, पापण्या अचानक जास्त प्रमाणात गळत असतील, तर पापण्यांच्या मुळाशी होणारी सूज, त्वचेची समस्या, थायरॉईडसारखे काही आजार किंवा औषधांचे दुष्परिणाम असू शकतात.
मस्कारा, आयलायनर किंवा इतर मेकअप काढताना डोळे जोरात चोळू नका. डोळ्यांसाठी योग्य मेकअप रिमूव्हर वापरून मेकअप हळुवारपणे काढा. मेकअपसह झोपणं टाळा.
पापण्यांच्या मुळाशी कोंडा, चिकट स्राव किंवा खाज जाणवत असेल, तर पापण्यांची स्वच्छता राखणं महत्त्वाचं आहे. स्वच्छ कोमट पाण्यात भिजवलेला कपडा बंद डोळ्यांवर हलक्या हाताने फिरवा.
डोळे वारंवार चोळल्याने पापण्यांचे केस तुटू शकतात किंवा गळू शकतात. खाज येत असल्यास डोळे चोळणे टाळा आणि डोळ्यांवर पाणी मारा.
पापण्यांच्या केसांच्या निरोगी वाढीसाठी शरीराला प्रोटीन, लोह, झिंक आणि इतर पोषक घटकांची गरज असते. आहारात डाळी, कडधान्यं, अंडी, पालेभाज्या, सुका मेवा आणि फळांचा समावेश करा.
पापण्या दाट करण्यासाठी एरंडेल तेल किंवा इतर तेलांचा वापर करु शकता. त्रास जळजळ झाल्याने लावणे लगेच थांबवा.
तर नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या. डोळ्यांना तीव्र वेदना, लालसरपणा किंवा दृष्टीत बदल जाणवल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या. कारणानुसार योग्य उपचार केल्याने फायदा होऊ शकतो.
डिस्क्लेमर: ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.