Sakshi Sunil Jadhav
सुंदर, जाड भुवया चेहऱ्याचं सौंदर्य जास्त खुलवतात. मात्र, सतत शेपिंग, केमिकल प्रॉडक्ट्सच्या वापरामुळे आयब्रो पातळ होण्याची समस्या वाढते. महागडे सीरम न वापरता, फक्त रात्रीचं एक साधी रुटीन फॉलो केल्याने भुवया नॅचरली वाढतात.
रोज रात्री झोपायच्या आधी आयब्रो पेन्सिल, जेल किंवा मेकअप नीट काढून टाका. नाहीतर तुमचे आयब्रो नकळत गळायला सुरुवात होईल.
कोमट पाण्याने चेहरा धुतल्यावर पोर्स ओपन होतात आणि पोषण त्वचेपर्यंत पोहोचतं.
केस्टर ऑइल, नारळाचं तेल किंवा बदामाचं तेल स्वच्छ ब्रशने भुवयांवर लावून हलकी मालिश करा. याने केसांना पोषण मिळतं.
भुवयांवर गोलाकारात (सर्क्युलेशन) मसाज केल्यावर रक्तप्रवाह वाढतो आणि केसांची वाढ लवकर होते.
आठवड्यातून २ ते ३ वेळा व्हिटॅमिन ईची आयब्रो भुवयांवर लावा. याने ते केस मजबूत होतील आणि गळण्याची समस्या कमी होईल.
अलोवेरा जेल केसांना पोषण देतं आणि केसांची गळती कमी होण्यासाठी हे फायदेशीर मानलं जातं.
रात्री झोपण्याआधी भुवया ओढणं किंवा ट्रिम करणं थांबवा. यामुळे केसांच्या मुळांवर ताण पडतो. त्याने वाढ खुंटते.