Shruti Vilas Kadam
आय मेकअप करण्यापूर्वी आय प्रायमर लावल्याने आयशॅडो दीर्घकाळ टिकतो आणि स्मज होत नाही.
तुमच्या स्किन टोन आणि आउटफिटनुसार आयशॅडोचे रंग निवडा, ज्यामुळे लूक अधिक उठून दिसतो.
आयशॅडो नीट ब्लेंड केल्याने डोळ्यांना स्मूद आणि प्रोफेशनल लूक मिळतो.
डोळ्यांच्या आकारानुसार आयलाइनर लावा. विंग्ड लाइनर किंवा थिन लाइनर तुमचा लूक बदलू शकतो.
काजळ लावताना खूप जाड रेषा टाळा. हलकासा काजळ लुक अधिक नैसर्गिक दिसतो.
मस्कारा लावल्याने पापण्या दाट आणि लांब दिसतात, ज्यामुळे डोळे अधिक आकर्षक दिसतात.
भुवया व्यवस्थित सेट केल्याने संपूर्ण आय मेकअप लूक परफेक्ट दिसतो.