Eye Care: डोळ्यांखाली खूप डार्क सर्कल्स झालेत? मग, हा घरगुती उपाय कायमचे डार्क सर्कल्स करतील कमी

Shruti Vilas Kadam

पुरेशी झोप घ्या

दररोज किमान ७–८ तास झोप घेतल्यास डोळ्यांखालील काळेपणा कमी होण्यास मदत होते. अपुरी झोप ही डार्क सर्कल्सचे मुख्य कारण आहे.

Eye Care

थंड काकडी किंवा बटाट्याच्या चकत्या ठेवा

काकडी किंवा कच्च्या बटाट्याच्या थंड चकत्या डोळ्यांवर ठेवल्यास सूज कमी होते आणि डार्क सर्कल्स हलके होतात.

Eye Care

बदाम तेलाचा वापर करा

झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली बदाम तेलाने हलका मसाज केल्यास त्वचेला पोषण मिळते आणि काळेपणा कमी होतो.

Eye Care

गुलाबपाणी लावा

कॉटनमध्ये गुलाबपाणी भिजवून डोळ्यांवर ठेवल्यास थकवा कमी होतो आणि त्वचा ताजीतवानी दिसते.

Face Care

पाणी भरपूर प्या

शरीर डिहायड्रेट असल्यास डार्क सर्कल्स अधिक दिसतात. त्यामुळे दिवसभरात ८–१० ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे.

Eye Care

हेल्दी आहार घ्या

व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E आणि आयर्नयुक्त आहार घेतल्यास डोळ्यांखालची त्वचा निरोगी राहते. फळे, हिरव्या भाज्या आणि सुकामेवा आहारात समाविष्ट करा.

Jannat Zubair Eyes and Lips | Instagram @jannatzubair29

स्क्रीन टाइम कमी करा

मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीचा अति वापर डोळ्यांवर ताण आणतो. त्यामुळे स्क्रीनपासून वेळोवेळी ब्रेक घेणे आवश्यक आहे.

Eye Care