Shraddha Thik
तुम्हीही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही SIP द्वारे गुंतवणूक करू शकता. बचत आणि गुंतवणूक करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
SIP द्वारे म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याबाबत लोकांच्या मनात काही गैरसमज आहेत.
तुम्हाला SIP शी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहोत. जेणेकरून तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून मोठा फंड देखील तयार करू शकता.
सर्वप्रथम, SIP ही फक्त गुंतवणुकीची पद्धत आहे. वास्तविक गुंतवणूक फक्त म्युच्युअल फंडमध्येच करावी. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही ठराविक कालावधीत ठराविक रक्कम हप्त्यांमध्ये गुंतवू शकता.
लोक सहसा SIP करण्याबद्दल बोलतात परंतु काही लोकांना असे असे वाटते की, एसआयपी आणि म्युच्युअल फंड हे दोन वेगळे फंड आहेत, परंतु तसे नाही.
म्युच्युअल फंडमध्ये हप्त्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या पद्धतीला SIP म्हणतात. ELSS किवा टॅक्स सेव्हिंग फंडमध्ये गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला आयकर सूट मिळू शकते.
जुन्या टॅक्स सिस्टमनुसार, तुम्हाला आयकर कलम 800 अंतर्गत वार्षिक 1 लाख पन्नास हजार रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर सूट मिळू शकते.
तुम्ही ELSS मध्ये गुंतवणुक केल्यास, तुम्ही एका आर्थिक वर्षात 1 लाख रुपयांपर्यंतच्या Long Term Capital Gains वर कर भरणे टाळू शकता.