Bharat Jadhav
एखादी व्यक्ती नजर लागली तर तेव्हा तिला आयुष्यात सतत समस्यांचा सामना करावा लागतो. त्या व्यक्तीला विविध अडचणी व चढ-उतारांशी झुंजत राहवे लागते.
'नजर' लागल्यामुळे कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवतात? कधीकधी खुद्द त्या व्यक्तीचीच नजर कारणीभूत ठरू शकते. याचा त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो?
जर एखाद्याची वाईट नजर तुमच्यावर पडली, तर त्याचे परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसून येतात. एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर तुम्हाला थकवा, अशक्तपणा आणि तणाव जाणवू शकतो. हे 'नजर लागल्याचे' लक्षण असू शकते.
अडचणी, अशक्तपणा येत असेल त्याला नकारात्मक ऊर्जेचा परिणाम मानले जाते. नजर लागल्यामुळे तुमची कामे रखडू शकतात. कामात वारंवार येणारे अडथळे हे त्याचेच एक लक्षण आहे.
अनेकदा द्वेषातून निर्माण होणाऱ्या नकारात्मक ऊर्जेमुळे गोष्टी बिघडतात. लोकांना तुम्हाला आनंदी पाहणे आवडत नाही. त्यांच्या वाईट भावनेमुळे तुमच्या योजना अयशस्वी होऊ शकतात. हे टाळण्यासाठी, तुम्ही तुमचे काही प्लॅन कोणाशीही शेअर करू नयेत.
तुमच्या भविष्यातील प्लॅनिग असेल किंवा काही कामे असतील ते नेहमी गुप्त ठेवली पाहिजेत. नाहीतर भविष्यात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. काही लोकांना तुमच्याबद्दलचा हेवा किंवा मत्सर वाटत असतो. त्यावेळी तुम्हाला त्यांच्या सहवासात अस्वस्थ वाटत असते.
भविष्यातील योजना इतरांशी शेअर करता, ज्यामुळे तुम्हाला दृष्ट लागण्याची शक्यता असते. पूर्णत्वाच्या मार्गावर असलेली कामे अनेकदा बिघडतात. सकारात्मक राहण्यासाठी आणि दृष्टदोष टाळण्यासाठी तुम्ही पूजा-अर्चा, प्रार्थना आणि मंत्रजप केला पाहिजे.
नकारात्मकतेमुळे गोष्टी बिघडू शकतात. मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. हे टाळण्यासाठी तुम्ही नकारात्मक विचार आणि प्रवृत्तीच्या लोकांपासून दूर राहिले पाहिजे.