Surabhi Jagdish
नुकत्याच केलेल्या एका रिसर्चनुसार, महासागराच्या खोलीत ऑक्सिजन निर्माण होतो. मात्र हा डार्क ऑक्सिजन असतो.
डार्क ऑक्सिजन काही वेगळं नसून ऑक्सिजनचा एक स्त्रोत आहे. हा समुद्राच्या खोलाशी सापडतो, जिथे सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही.
डार्क ऑक्सिजन समुद्राच्या खोलीमध्ये असलेल्या पॉलीमेटेलिक नोड्यूल्स नावाच्या खनिजापासून उत्पन्न होतो. ज्यामध्ये लोहं आणि मँगनीज हे धातू असतात.
नोड्यूल्स समुद्राच्या पाण्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजनला विभाजित करतात. ज्यामुळे ऑक्सिजन तयार होतो.
या स्त्रोताने हे स्पष्ट झालं आहे की, ऑक्सिजनचा अजून एक स्त्रोत उपलब्ध आहे.
सोप्या शब्दात सांगायचं झालं तर प्रकाशाशिवाय ऑक्सिजन तयार करणं याला डार्क ऑक्सिजन म्हणतात.