Manasvi Choudhary
मुले मोठी झाली की त्याची योग्य काळजी घेणे पालकांसाठी महत्वाचे असते.
वयाच्या प्रत्येक टप्प्यानंतर पालक म्हणून आई- वडीलांची मोठी जबाबदारी असते.
मुलाचं लहानपण जितकं महत्वाचं असतं तितकचं त्याचं वयात येणं असतं.
मुली वयात आल्यानंतर काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
मुली वयात आल्यानंतर त्यांना तुम्ही मूलापेक्षा कशातच कमी नाही हा विश्वास द्यायला हवा.
मुलीचं बोलणं जाणून घ्या. अनेकदा मुली या घाबरून काही बोलत नाही अशावेळी त्यांना धीर द्या.
जी गोष्ट आवडली नाही, मान्य नाही तिला ठामपणे नका द्यायला शिकवा.
मुली वयात आल्या की लाजतात किंवा घाबरतात अश्या त्यांच्या वयानुसार बदलांकडे विशेष लक्ष द्या.