Manasvi Choudhary
जागतिक दूरचित्रवाणी हा दिवस दरवर्षी २१ नोव्हेंबरला साजरा केला जातो.
भारतात १५ सप्टेंबर १९५९ मध्ये नवी दिल्ली येथे टेलिव्हिजनला सुरूवात झाली.
यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्यावतीने नोव्हेंबर १९९६ मध्ये पहिला जागतिक दूरदर्शन मंच आयोजित केला.
यावेळी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दूरचित्रवाणीच्या प्रगतीबद्दल चर्चा करण्यात आली.
दरम्यान २१ नोव्हेंबर रोजी जागतिक दूरचित्रवाणी दिन साजरा करण्याचीही घोषणा झाली.
जगभरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांपलीकडे दूरदर्शनचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा जागतिक दूरचित्रवाणी दिवस साजरा केला जातो.
टेलिव्हिजन हे जगामध्ये जागतिकीकरण आणि संवादाचे प्रतीक आहे.
दूरचित्रवाणी माध्यमांच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी सरकार,संस्था आणि व्यक्तींच्या भूमिकेचे कौतुक करण्यासाठी जागतिक दूरचित्रवाणी हा दिवस साजरा केला जातो.