Tulsi: उन्हाळ्यात तुळशीची पाने खाण्याचे फायदे कोणते? आरोग्यासाठी ठरतंय लाभदायक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुळशीची पाने

तुळशीच्या पानांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन सी, ए, के, पोटॅशियम, फायबर, अँटीऑक्सिडंट्सह, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात.

Tulsi | Google

फायदे

तुळशीच्या पानांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात. हे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

Tulsi | Freepik

घसा

उन्हाळ्यात धूळ आणि प्रदूषणामुळे घसा आणि श्वसनाच्या समस्या वाढतात. तुळशीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात जे यापासून संरक्षण करतात.

Tulsi | Saam Tv

पचनसंस्था

उष्णतेमुळे अनेकदा गॅस, अपचन आणि पोटात फुगणे अशा समस्या होतात. तुळशीची पाने पाचक एंजाइम सक्रिय करतात यामुळे पचन सुरळीत राहते.

Tulsi | yandex

निरोगी त्वचा

तुळस रक्त शुद्ध करते, ज्यामुळे चेहऱ्यावरील मुरुमे, डाग कमी होतात. तसेच उन्हाळ्यात होणाऱ्या अॅलर्जी आणि पुरळांपासूनही आराम मिळतो.

Tulsi | yandex

रोगप्रतिकारशक्ती

तुळशीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. ज्यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या संसर्गापासून संरक्षण होते.

Tulsi | yandex

कसे सेवन करावे

तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी ४ ते ५ तुळशीची पाने चावू शकता. तुम्ही तुळशीची पाने पाण्यात उकळून, थंड करून पिऊ शकता. तसेच, तुम्ही लिंबू पाणी, ताक किंवा ग्रीन टीमध्ये तुळस मिसळू शकता.

Tulsi | Freepik

NEXT: ऑफिसमध्ये तुमचा बॉस कसा इम्प्रेस होईल, हे ५ स्किल्स शिका

office | freepik
येथे क्लिक करा