Manasvi Choudhary
तूप आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. अनेकांना रोजच्या जेवणात पोळीवर किंवा भातावर तूप घेण्याची सवय असते.
पण, तुम्ही कधी सकाळी रिकाम्या पोटी तूप खाल्लय का? तूप खाण्याचे शरीराला आरोग्यदायी फायदे आहेत.
आयुर्वेदामध्ये सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप खाणे अत्यंत औषधी आणि गुणकारी मानले गेले आहे. यामुळे शरीरात अनेक सकारात्मक बदल होतात.
तुपामध्ये 'ब्युटिरीक ॲसिड' भरपूर प्रमाणात असते, जे पोटाचे आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. यामुळे पोटातील विषारी घटक बाहेर फेकले जातात आणि बद्धकोष्ठता, पोटफुगी किंवा अपचना या समस्या दूर होतात.
जर तुम्हाला दिवसभर आळस किंवा थकवा जाणवत असेल, तर सकाळी रिकाम्या पोटी तूप खा. शरीराला उर्जा मिळेल.
तुपामध्ये व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के ही पोषक तत्त्वे असतात. रिकाम्या पोटी तूपाचे सेवन केल्याने त्वचेला आतून पोषण मिळते आणि त्वचा नैसर्गिकरित्या चमकते.
वाढत्या वयानुसार हाडे कमजोर होण्याची समस्या उद्भवते. तुपाचे नियमित सेवन केल्याने हाडांना व सांध्यांना मजबूती मिळते.
सकाळी उठल्यानंतर एका ग्लास कोमट पाण्यात अर्धा किंवा एक चमचा तूप चांगले मिसळून ते पाणी पिऊ शकता.
एक चमचा तूप खाऊन त्यावर एक ग्लास कोमट पाणी पिणे फायद्याचे आहे.
जर तुम्हाला चहा किंवा कॉफीमध्ये आवडत असेल, तर तुम्ही तुमच्या चहा किंवा कॉफीमध्ये एक चमचा तूप घालून पिऊ शकता
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.