Shruti Vilas Kadam
सफरचंदामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. नियमित खल्ल्यास पचनक्रिया सुधारण्यास आणि रोगप्रतिकारक शक्तीला आधार मिळण्यास मदत होऊ शकते.
पेरमध्ये पाण्याचे प्रमाण आणि फायबर भरपूर असते. त्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास आणि पचन व्यवस्थित होण्यास मदत मिळते.
डाळिंबात लोह, व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात. रक्तातील हिमोग्लोबिन टिकवून ठेवण्यास आणि शरीराला एनर्जी मिळण्यास मदत होते.
पावसाळ्यात मिळणाऱ्या होणारे जांभळात अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असते. रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यास यामुळे मदत होऊ शकते आणि पचनालाही आधार मिळतो.
पपईमध्ये पपेन एन्झाइम आणि फायबर असते. हे पचन सुधारण्यास मदत करू शकते. पावसाळ्यात जड अन्न खाल्ल्यानंतर पपई उपयुक्त ठरू शकते.
केळीमध्ये पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स आणि ऊर्जा देणारे पोषक घटक असतात. थकवा कमी करण्यास आणि शरीराला झटपट ऊर्जा मिळवून देण्यास मदत होऊ शकते.
पावसाळ्यात फळे नेहमी स्वच्छ पाण्याने धुवूनच खा. आधीच कापून ठेवलेली किंवा रस्त्यावर उघडी ठेवलेली फळे टाळा. हंगामी आणि ताजी फळे निवडणे अधिक सुरक्षित ठरते.