ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केसांसाठी पोषण महत्वाचे आहे. योग्य आहार केसांना मजबूत आणि दाट होण्यास मदत करू शकतो.
अंडीमध्ये प्रोटीन आणि बायोटिनचे प्रमाण जास्त असते. जे केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहे.
पालकमध्ये आयरन, फोलेट आणि व्हिटॅमिन ए आणि के असते. जे केसांना निरोगी ठेवण्यास मदत करतात.
बेरीज हे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात.
नट्स आणि बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ई असते. जे केसांसाठी फायदेशीर आहे.
रताळ्यामध्ये बीटा कॅरेटीन असते. ज्याचे रुपांतर नंतर व्हिटॅमिन ए मध्ये होते. हे केसांना मॉइश्चरायइज्ड करण्या मदत करतात.
अवाकाडोमध्ये व्हिटॅमिन ई असते. जे स्कॅल्पचे आरोग्य सुधारते आणि केसांना सॉफ्ट करते.