Siddhi Hande
नवरात्र सुरु झाली आहे. रात्री अनेक ठिकाणी गरबा-दांडियाचे आयोजन केले जाते.
गरबा खेळताना अनेक मुली छान घागरा घालतात. त्यावर मॅचिंग ज्वेलरीदेखील घालतात.
नवरात्रीनिमित्त तुम्ही छान मोठे झुमके घालू शकतात. वेगवेगळ्या ड्रेसवर वेगवेगळे इअररिंग्स ट्राय करु शकतात.
तुम्ही जर सिंपल घागरा घातला असेल तर त्यावर छान ऑक्साइड ज्वेलरी घालू शकतात. त्यात मोठे ऑक्साइड झुमके खूप सुंदर दिसतील.
तुम्ही जर कॉटन साडी नेसली असेल तर त्यावर छान सिंपल ऑक्साइड इअररिंग्स आणि त्यावर मॅचिंग हार घालू शकतात.
तुम्ही जर ड्रेस घातला असेल तर त्यावर सिंपल चोकर आणि मोठे इअररिंग्स घालू शकतात.
एखाद्या ड्रेसवर तुम्ही फक्त मोठे झुमके घालू शकतात. यामुळे तुमचा लूक अजून खुलेल.
तुम्ही इअअरिंग्ससोबत नाकात छान नोझपिन घालू शकतात. नोझपिनने अजून छान लूक येईल.