Sakshi Sunil Jadhav
तोंडातील पांढऱ्या किंवा लाल चट्टे हे ओठ, जीभ, गालाच्या आतल्या बाजूस दिसल्यास ते कॅन्सरचे लक्षण असू शकते.
तोंडातल्या न भरणारे जखमा दोन ते तीन आठवड्यांनंतरही भरून न आल्यास तातडीने तपासणी गरजेची आहे.
जीभ किंवा हिरड्यांवर लहान गाठी किंवा सूज कायम राहणे हे धोक्याचे चिन्ह.
साध्या जखमेपेक्षा वेगळ्या वेदना जास्तवेळ असल्यास कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो.
ब्रश करताना किंवा खाल्ल्यानंतर वारंवार रक्त येणे हे गंभीर लक्षण आहे.
बदललेला श्वासाचा वास आणि गिळताना गळ्यात अडथळा निर्माण होणे हे देखील संकेत आहेत.
जीभ किंवा ओठ सुन्न होणे हे आरंभीचे लक्षण असू शकते.
तंबाखू, गुटखा, धूम्रपान, जास्त मद्यपान हे सर्व तोंडाच्या कॅन्सरला कारणीभूत ठरतात.