Breakfast After Tea : चहा प्यायल्यानंतर किती वेळाने नाश्ता करावा?

Shreya Maskar

चहा पिणे

चहाप्रेमी चहा पिण्यासाठी कधीही तयार असतात. त्यांच्या सकाळची सुरुवातच एक कप चहाने होते. चहा-नाश्ता म्हणजे सकाळचे प्रोटिन असते.

drink tea | pinterest

चहानंतर नाश्ता कधी?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चहा प्यायल्यानंतर ४५-६० मिनिटांनी नाश्ता करावा किंवा नाश्ता केल्यानंतर साधारण ३० ते ६० मिनिटांनी चहा प्यावा.

breakfast | pinterest

रिकाम्या पोटी चहा टाळा

सकाळी उठल्याबरोबर चहा प्यायल्याने ॲसिडिटी, गॅस आणि छातीत जळजळ होऊ शकते, तसेच शरीराद्वारे पोषक तत्वे शोषून घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो, त्यामुळे नाश्ता झाल्यावर चहा प्या.

tea on an empty stomach | pinterest

आरोग्य तज्ज्ञ

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेवण किंवा नाश्ता आणि चहा यांच्यात किमान ३० ते ६० मिनिटांचे अंतर असावे, कारण चहामधील टॅनिन हे अन्नातील लोह आणि आवश्यक पोषक तत्वे शोषून घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणू शकतात.

Health expert | pinterest

सकाळी चहासोबत काय खावे?

सकाळी चहासोबत तुम्ही पोहे, उपमा, ब्रेड, ओट्स, दलिया खाऊ शकता. फायबरयुक्त नाश्ता आरोग्यास जास्त फायदेशीर ठरतो. बदाम किंवा अक्रोड देखील खाऊ शकता.

What to eat with morning tea? | pinterest

चहा पिण्याची योग्य पद्धत?

सकाळी उठल्यानंतर तहान लागलेली असल्यास पाणी प्या.रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने त्रास होत असेल तर आधी काहीतरी खा. चहामध्ये साखर कमी ठेवा.

tea | pinterest

हृदयाचे ठोके वाढणे

रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने हृदयाचे ठोके वाढतात. चहामध्ये कॅफिन असते. काही व्यक्तींना जास्त कॅफिन घेतल्यास अस्वस्थता, हात थरथरणे किंवा हृदयाचे ठोके वाढल्यासारखे वाटू शकते.

heart rate | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Tea | pinterest

NEXT : २ अख्खी अंडी की ५ अंड्यांचा पांढरा भाग, वजन कमी करण्यासाठी काय बेस्ट?

Egg | AI PHOTO
येथे क्लिक करा...