ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेक जण म्हणतात चहाला वेळ नसते तर वेळेला चहा लागतो.
जेवण झाल्यानंतर चहा पिण्याची सवय असते, पण हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
सकाळी किंवा दिवसभर जेवणानंतर एक कप चहा पिण्याची सवय आपल्यापैकी अनेकांना आहे मात्र ही सवय बदलण्याची गरज आहे.
जेवण केल्यानंतर चहा पिण्याची ही सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. चहामध्ये कॅफिन असते. जे शरीरात कॉर्टिसॉल किंवा स्टेरॉइड हार्मोन्स वाढवते.
जे लोक जेवणानंतर चहा पितात त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असू शकतो. चहामध्ये कॅफिन असते, त्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.
जेवणानंतर लगेच चहा पिल्यास पचनसंस्थेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. अन्न खाल्ल्यानंतर लगेच चहा पिल्याने शरीराची पचनक्रिया कमकुवत होते
जेवणानंतर चहा प्यायल्याने शरीरात लोहाची कमतरता जाणवू शकते. चहा प्यायल्याने शरीर प्रथिनांसह आवश्यक पोषक द्रव्यांचे शोषण करु शकत नाही.