Shruti Vilas Kadam
अद्रक पाणी पचनक्रिया मजबूत करते. पोटात गॅस, फुगणे किंवा अपचनाची समस्या असल्यास ते लवकर आराम देते.
आल्यातील अँटिऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. नियमित अर्धक पाणी घेतल्याने सर्दी, खोकला आणि संसर्ग यांचा त्रास कमी होतो.
अद्रक पाणी शरीरातील मेटाबॉलिझम वाढवते. चरबी जळण्याचा वेग वाढल्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
आल्याचे पाणी शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करते. यामुळे त्वचा स्वच्छ राहते आणि शरीर हलके वाटते.
आल्यातील अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मामुळे सांधेदुखी, स्नायू दुखणे किंवा मासिक पाळीच्या वेदनांमध्ये आराम मिळतो.
अद्रक पाणी रक्ताभिसरण सुधारून हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत होते.
थंडी, खोकला, घश्यात कफ किंवा दुखत असल्यास कोमट अद्रक पाणी लगेच आराम देते. हे नैसर्गिक कफनाशक म्हणून काम करते.